spot_img
spot_img

जानेफळात ठाणेदार अजिनाथ मोरे यांचा हुकूम! – चार चाकीवर ब्लॅक फिल्म,फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारणार!

जानेफळ (हॅलो बुलढाणा) कारच्या काळ्या काचा ठेवायची क्रेज वाढली आहे.
कारच्या काचांवर काळी फिल्म लावली जाते, पण असे करणे बेकायदेशीर आहे.फॅन्सी नंबर,विना प्लेट नंबर जानेफळ पोलीस स्टेशन क्षेत्रातील वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी दिला आहे.त्यांनी अशा वाहनांचे फोटो पाठवावे असे आवाहनही केले आहे.

वाहतूक नियमांनुसार कारच्या आरशांवर झिरो विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावल्यास चलान आहे. कारण, हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या कक्षेत येते. शिवाय फॅन्सी नंबर वाहनांवर टाकणे,विना नंबर प्लेट गाडी चालविणे हा सुद्धा गुन्हा आहे. परंतु अलीकडे स्वॅग दाखवण्यासाठी चार चाकी गाड्यांना काळ्या काचा वापरतात. त्यामुळे पोलिसांना दंड आकारावे लागत आहे. याशिवाय आजकाल दंडाचीची रक्कमही खूप वाढली आहे. कारच्या काचा पूर्णपणे काळ्या करता येणार नाही, काय आहे नियम? जाणून घ्या ..

▪️ब्लॅक फिल्मबाबत काय नियम आहे?

मे 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने कारच्या टिंटेड काचेबाबत निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार, कारच्या पुढील आणि मागील आरशांची विजिबिलीटी किमान 70 टक्के असावी. याचा अर्थ कारच्या पुढील आणि मागील आरशांमधून किमान 70 टक्के प्रकाश आत आला पाहिजे. त्याच वेळी, बाजूच्या काचेची विजिबिलीटी किमान 50 टक्के असावी. याचा अर्थ असा की, कारच्या साइड मिररमधून 50 टक्के प्रकाश आत यावा.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!