बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळणी गावात भर दिवसा अवैध दारू विक्री होत आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून अनेकांचे बळी गेले त्यामुळे गावात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मोताळाचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बोदडे यांनी ठाणेदारांना केली असून, 16 ऑगस्ट पासून तहसील समोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.
अवैध दारू विक्री बुलढाण्यात काही कमी होत नाही. येथे चक्क दारूचा महापूर वाहतोय. परंतु हप्तेखोरीमुळे हे चित्र जैसे थेच आहे.पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. तळणी गावात खुलेआम दारू विक्री होते.याला पोलिसांची साथ मिळत आहे,असा आरोप होत आहे.
दारू विक्रेत्यांची
तक्रार झाल्यानंतर दारू विक्रते एक दिवस दारू विक्री बंद ठेवून दुसऱ्या दिवशी पुन्हा दारू विक्री करण्यास सज्ज होतात. गतवर्षी 22 एप्रिल 2023 रोजी तळणी ग्रामस्थांनी दारूबंदीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. परंतु यावर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे उद्या 16 ऑगस्ट पासून तहसील समोर आमरण उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा
वंचित बहुजन आघाडी मोताळाचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बोदडे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.










