बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेसच्या आजच्या आढावा बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विरोधकांवर तोंड सुख घेत आहे.महाविकास आघाडी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी विजय संपादन करणार असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी रोजगाराच्या विषयावर तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर लक्ष दिले नाही. हे सरकार फक्त कागदपत्री योजनेसाठी आणि सत्तेसाठी काम करत आहे . महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढणार आणि मोठ्या मतांनी विजयी सुद्धा होणार.
मराठा आरक्षण असो किंवा धनगर समाजाची विविध प्रश्न कुठल्याही विषयाला या सरकारने न्याय दिला नाही,असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.