बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशनखोरी करून स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या जमिनी बाळकावून दादागिरी करून विकास दाखवित आहे.सत्तेची मस्ती साठवून लोकांना वेठीस धरल्या जात आहे. हे काम अवघ्या महाराष्ट्रात धोकेबाज आमदार करत असून या ऐतिहासिक भ्रष्टाचाऱ्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.हे यश आहे की अपयश? हे जनतेने सांगावे,असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला.सध्या आढावा बैठक सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आढावा बैठक होऊ घातली आहे. प्रदेश काँग्रेस प्रभारी चेन्नीथल्ला,नाना पटोले, मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अकोला- वाशिम बुलढाणाची ही आढावा बैठक आहे.या बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी थेट नाव न घेता एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेवर निशाणा साधला. कारण येथे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड आहेत.त्यांच्या शहर सौंदर्यकरणाला आणि विकास कार्याला विजय वडेट्टीवार यांनी टारगेट केले.ते म्हणाले हे सर्व कमिशन खोरीतून झाले आहे. दादागिरी करून लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. सर्वाधिक कमिशन घेऊन फार्म हाऊस बांधले व तेही दुसऱ्याच्या जागेवर दुसऱ्याची जमीन हडप सुद्धा त्यांनी केली. सध्या हे त्रिकूट सरकार देवेंद्र फडवणीस एकनाथ शिंदे व अजित पवार जनतेला चांगलेच लुटत आहे.
हे सरकारच धोकेबाज असल्याचे ते म्हणाले..