बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजकारण खालच्या स्तराला गेले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर काल ठाणे येथे झालेला हल्ला भ्याड आणि निषेधार्ह आहे. या हल्ल्याने महाराष्ट्राची वाटचाल किती टोकाच्या द्वेषाकडे आणि कट्टरतेकडे होतेय हे लक्षात येत असून, सदर हिंसेतील सहभागी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी केली आहे.शिवाय या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदविला आहे.
राज्याचे गृहमंत्रालय महाराष्ट्र राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला सुरक्षा पुरवु शकत नसेल तर सामान्य माणसाच्या सुरक्षिततेचे काय?? दोन पक्षांच्या विचारांमध्ये तफावत असणार आहे. पण विरोध करतांना काळे झेंडे दाखवणे, विरोधात घोषणा देने याच्यापुढे जात मनात द्वेष पेरून हिंसा करणे याचे समर्थन होऊ शकत नाही,असे जयश्रीताई म्हणाल्या. महाराष्ट्राच्या गृहखात्याने याची गांभीर्याने दखल घेत या हिंसेत सहभागी दोषींवर तात्काळ कारवाई ,अशी मागणी देखील त्यांनी लावून धरली आहे.