बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभेचे वेध लागले आणि या गटातील त्या गटात जाणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी देखील निर्माण होऊ लागली आहे.शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मासरूळ उबाठाच्या दलित लहुजी शक्ती आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश झाला आहे.
११ ऑगस्ट रोजी आमदार गायकवाड यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून मासरूळ येथील उ.बा.ठा. गटाचे दलित लहुजी शक्ती आघाडी उपजिल्हाप्रमुख दादाराव बन्सी महाले यांच्यासह तेजराव निकाळजे, संजय अवसरमोल, अनिल महाले, विजय महाले, अनिल दादाराव महाले, विनोद महाले, मोहन सुभाष महाले, भारत महाले, समाधान सुरूशे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, शिवसेना ज्येष्ठ नेते अशोक इंगळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख दीपक तुपकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.