spot_img
spot_img

संतापाची ठिणगी! ‘कुणी नेता नाही पावरफुल..धरणगावात बत्ती गुल!’

धरणगाव (हॅलो बुलढाणा/करण झनके)मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथिल रहिवासी वीज पुरवठ्यातील सततच्या व्यत्ययांमुळे कंटाळले आहेत. वारंवार वीज खंडित होणे आणि देखभालीचा अभाव हे त्यांच्या मूलभूत गरजांकडे स्पष्ट दुर्लक्ष आहे. विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असलेल्यांच्या जबाबदारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने परिस्थिती असह्य झाली आहे.येथे कुणी पावरफूल नेता नसल्याने नेहमीच बत्ती गुल असल्याचे चित्र संताप व्यक्त करण्यासाठी पूरक ठरत आहे.

धरणगाव हे दसरखेड सब स्टेशन पासून शेवटचे गाव असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जातो परिणामी यामुळे नेहमीच स्पर्किग होते. विजेवर चालणाऱ्या महागडे उपकरणाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. पिण्याचे पाण्या पासून ते गावातील स्टेट लाईन पासून नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहे.याबाबत अनेकदा गावातील नागरिक व ग्रामपंचायत ने महावितरणला पत्रव्यवहार केला माञ महावितरणचे अधिकारी व कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन असल्याचा संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी वार्ड क्रमांक (१)मधील दुकानदार किशोर झनके यांच्या दुकानात रात्री ८:३० ते ९:०० दरम्यान विद्युत प्रवाह कमी जास्त होत असल्याने शॉर्टसर्किटने दुकानात आग लागली.जवळपास 50 ते 60 हजाराचे वस्तू जळून खाक झाले.
तरी सुद्धा महावितरणने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. करिता विद्युत प्रवाह सुरळीत करण्यात महावितरणने दुर्लक्ष केले तर गावकऱ्यांकडून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महावितरण ला देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!