बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बाबासाहेब धाबेकर कापूस पणन महासंघ कर्मचारी सूतगिरणी मर्यादित,अकोला कारंजा लाड यांच्याकडे उद्योजकांचे 1 कोटी 54 लाख रुपये थकीत आहेत.ते वसूल करून देऊन दोषींवर कारवाईची मागणी एका निवेदनाद्वारे नागपूर वस्त्रोद्योगाच्या प्रादेशिक आयुक्तांना करण्यात आली आहे. ही तक्रार महाराजा अग्रसेन कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीचे अध्यक्ष अशोक बाबुलाल अग्रवाल यांनी केली आहे.
बाबासाहेब धाबेकरकापूस पणन महासंघ कर्मचारी सूतगिरणी मर्यादित, अकोला कारंजा लाड यांच्याकडे उद्योजकांचे पर्याय आणि शेतकऱ्यांचे 1 कोटी 54 लाख रुपये थकित असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.24 मे 2024 रोजी कटकारस्थान रचले व खोटे कागदपत्र तयार करून चार ट्रक माल भरून देण्याची गद्दारी केली.अर्धे ट्रक रिकामे ठेवून त्यात उपयोगी न पडणारा कचरा माल भरला ही बाब दुसऱ्या दिवशी माहित पडूनही याबाबत खुलासा केला नाही.त्यामुळे सूतगिरणीला थकीत पेमेंट 1 कोटी 54 लाख रुपये देण्याचे आदेशित करावे शिवाय शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.