spot_img
spot_img

ऐकू तर येतच नाही.. बघा नीट! बायोवेस्ट रस्त्यावर फेकल्याने आरोग्य धोक्यात! सुंदरखेडच्या लोकप्रतिनिधी खरंच सुशिक्षित आहेत का?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सर्वात श्रीमंत असलेली सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत परिसरातील काही हॉस्पिल मधील जैविक कचरा असो की,इतर कोणता कचरा तो मात्र जिथे टाकायचा तिथेच टाकायला हवा विशेष म्हणजे शासनाने जैविक कचऱ्यासाठी व्हॅन उपलब्ध करून दिली आहे.तरी मात्र सुंदरखेड परिसरात बायोवेस्ट दिसून येत आहे.परिणामी

सुंदरखेडचे लोकप्रतिनिधी खरंच सुशिक्षित आहेत का?असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.नागरिकांची अशी तक्रार आहे की,
शहरातील हॉस्पिटलचे बायोवेस्ट सुंदर खेड परिसरात फेकले जाते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.बुलढाणा शहरात असंख्य खाजगी रुग्णालये आहेत.. त्यांच्या हॉस्पिटलमधील बायोवेस्ट ची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंपनीचे एक वाहन येऊन तो जैविक कचरा घेऊन जात असते.
मात्र काही रुग्णलायातील बायोवेस्ट सरळ रस्त्याच्या एका वापरात न येणाऱ्या जागेत फेकल्या जात आहे… हे ठिकाण सूंदरखेड परिसर असून हॉस्पिटलच्या बायोवेस्ट फेकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे सुंदरखेड ग्रामपंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे .. महसूल विभागाचे भवन परिसरात हे बायोवेस्ट फेकल्या जात आहे.. याविरोधात ग्रामपंचायतीला अनेक निवेदने गेलीत मात्र दुर्लक्ष केल्याने जिल्हा प्रशासनाला सुद्धा कळविण्यात आले मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने वैतागून परिसरातील नागरिकाणी परिसर स्वच्छ करण्याचे हाती घेऊन नागरिक पुढे सरसावले आहेत…
पावसाळ्याचे दिवस आहेत साथीच्या आजाराणे जिल्ह्या सह शहरात थैमान घातले आहे.. यात शहरातील काही हॉस्पिटलच्या हलगर्जी पणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.. तातडीने संबधित विभागाने लक्ष घालून शहरात पाहणी करून असे कुठे बायोवेस्ट फेकले गेले असतील ते उचलून ते नष्ट करावे अशी मागणी सुंदरखेडवासी करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!