बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य खरेदीमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालाय. हे प्रकरण राज्यात गाजत असून त्यात पुन्हा एक भर पडली ती म्हणजे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची!
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय अपंग बोर्डातुन मोठ्या प्रमाणावर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे.हे प्रकरण बुलढाण्यातच नाही तर नुकतेच नाशिक मध्ये एका तहसिलदारासह 33 कर्मचार्यांची तर बेस्टमध्ये सुमारे 60 व्यक्तींनी अशी खोटी दिव्यांगाची प्रमाणपत्रे मिळविली असल्याचे दिसून आले आहे. केवळ शासकीय नौकर्याच नव्हे तर बदली,शासनाकडून मिळणार्या निरनिराळ्या एजन्सीज( गॅस, पेट्रोल पंप ई.) या शिवाय ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत वितरीत करण्यात येणारे गाळे अशा अनेक सवलती या खोट्या दिव्यांगांनी लाटलेल्या आहेत. राज्यातील एकूण वितरीत झालेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांपैकी किमान 60% प्रमाणपत्रे अपात्र लोकांना, शासनाचे निकष डावलून देण्यात आले असल्याची माहिती या क्षेत्रात काम करीत असलेल्या लोकांकडून मिळत आहे.या करिता शासकीय, निमशासकीय सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचार्यांची दिव्यांगता तपासून घेवून, चूकीचे व खोटे प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती व असे प्रमाणपत्र प्रमाणित करणार्या वैद्यकीय अधिकार्यांविरूद्ध तात्काळ फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी अनेक दिव्यांग संघटना करीत आहेत.










