बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालेले कुप्रसिद्ध जिल्हा सामान्य रुग्णालय एक नव्हे तर अनेक समस्येत अडकलेले आहे. आज तर चक्क ओपीडीत शौचालयाचे घाण पाणी शिरले होते.येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.नाकाला रुमाल बांधून मार्ग काढावा लागला.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अनेक दुखणे आहे.जिल्हा शल्य चिकित्सक म्हणा की डॉक्टर किंवा कर्मचारी रुग्णसेवेत तत्पर दिसून येत नाही.साफसफाई नावालाच आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातून स्वच्छते करिता लागणारे साहित्यच मिळत नाही.परिणामी तेरा तालुक्यातून येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.










