spot_img
spot_img

टॅक्टर व दूचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना बेड्या!

अंढेरा (हॅलो बुलढाणा) अंढेरा व चिखली पोलिसांनी संयुक्त कामगिरी करीत गांगलगाव येथील चोरी गेलेले ट्रॅक्टर व एक मोटरसायकल जप्त करून ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत गांगलगाव येथुन भरदिवसा एक टॅक्टर व एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना ४आॕगस्ट रोजी घडली होती.
गजानन हरिभाऊ म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.घटनेची माहिती मिळताच अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी तात्काळ तपासचक्र फिरविले.
गांगलगाव येथील रहिवासी असलेले गजानन हरिभाऊ म्हस्के यांचे स्वराज ७४२ एक्स टी लाल रंगाचे टॅक्टर सचिन शो रूम चिखली येथुन घेतले होते.टॕक्टर एम.एच २८ बी.डब्लिव्ह.१५१० क्रमांकाचे टॅक्टर मधुकर रामकृष्ण म्हस्के यांच्या घरासमोर उभे राहत असे. दि.४आॕगस्ट रोजी घरासमोर टॅक्टर उभा नसल्याने मधुकर रामकृष्ण म्हस्के यांनी गजानन हरिभाऊ म्हस्के यांना फोन करून सांगितले असता शोधाशोध घेतला परंतु टॕक्टर सापडले नाही.तसेच गावातील अनिल नागोराव आराख यांची मालकीची हिरो पॕशन प्रो मोटारसायकल क्रमांक एम‌एच २८ बीयु ८०९४ घरासमोरुन अज्ञात चोरट्या‌ंनी लंपास केल्याची घटना ४आॕगस्ट २०२४ रोजी उघडकीस आली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान पोलिसांना ट्रॅक्टर चोरीतील आरोपी हे मोटार सायकल क्रमांक MH २८ AR ४५१९ ने वरुड कडून ग्राम देऊळगाव घुबे कडे येणार आहेअशी गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी देऊळगाव घुबे येथे खाजगी वाहनाने रवाना होवुन कोनड खु त्रिफुली येथे सापळा रचुन मोटार सायकल वरील ईसमांना पकडले. शिवाजी दिनकर काळे वय ३२ वर्ष रा गांगलगाव ता. चिखली जि. बुलडाणा,वैभव विठ्ठल म्हस्के वय २४ वर्ष रा गांगलगाव ता. चिखली जि. , अमोल विष्णु गळकर वय ३० वर्ष रा गांगलगाव ता. चिखली जि. बुलडाणा असे आरोपींची नावे आहे. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.आरोपींकडून ट्रॅक्टर व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देउळगाव राजा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विकास पाटील ठाणेदार अंढेरा, पोउपनि श्री सुरेश जारवाल,गोरख राठोड,भरत पोफळे,भागवत गिरी तसेच पोलीस ठाणे चिखली डिबी पथकाचे पोउपनि नितिनसिंग चौव्हाण,अमोल गवई,प्रशांत धंदर,पंढरीनाथ मिसाळ यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!