spot_img
spot_img

शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध गौण खनिज उत्खनन! -गृह विभागाकडून परिवहन आयुक्तांना स्मरणपत्र – अवैध वाळू वाहतूक बाबतच्या अहवाला वरून ओढले ताशेरे

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक संदर्भात परिवहन विभागाच्या जबाबदारी बाबतचे अहवाल विहीत मुदतीत सादर न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य गृह परिवहन विभागाने परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना स्मरण पत्र देऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान परिवहन विभागाच्या हलगर्जीपणावर सदर पत्रात ताशेरे ओढण्यात आले आहे.

शासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याने वाळू सह अवैध गौण खनिज बाबत महसूल विभागासह पोलीस विभाग आणि परिवहन विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी याबाबत महाराष्ट्र राज्य युवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या महसूल विभागाने महसूल सह पोलिस आणि परिवहन विभागावर जबाबदारी निश्चित केली. यासंदर्भात सुधारित जी आर काढण्यात आला. श्री खरात यांच्या तक्रारीवरून अवैध वाळू संदर्भात परिवहन विभागाची संबंधित मुद्द्यांच्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश ४ जुलै २०२४ रोजीच्या पत्राद्वारे देण्यात आले होते. शासनाच्या गृह (परिवहन) विभागाने मागविलेल्या अहवाल दिलेल्या विहीत मुदतीत पर्यंत सादर करण्यात आला नसल्याने राज्याच्या गृह विभागाचे कक्ष अधिकारी सागर बी पाटील यांनी ३० ऑगस्ट २०२४ रोजी एका स्मरण पत्राद्वारे परिवहन विभागावर ताशेरे ओढले. लोकायुक्त व उप लोकआयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय यांच्या संदर्भाधिन पत्राच्या सहपत्रा मधील तक्रारीबाबत परिवहन विभागाशी संबंधित मुद्द्यांच्या अनुषंगाने शासनास तात्काळ आदेश सादर करण्यात यावा असे निर्देशित करण्यात आले आहे. श्री खरात यांच्या तक्रारी वरून शासनाने परिवहन विभागाकडून मागविलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!