बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची 380000 हजार ऑनलाइन लाभार्थ्यापैकी तीन दिवसात 160000 हजार लाभार्थ्यांची छाननी पूर्ण झाली आहे. राहिलेल्या लाभार्थ्यांची 3 दिवसात छाननी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात 15 टीम दोन शिफ्ट मध्ये काम करत आहेत.
मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावंत महिलांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.