spot_img
spot_img

दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आणि भ्रष्टाचाराकडे केंद्रीय आयुष्यमंत्री लक्ष देणार का?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात गेल्या आठ वर्षांत 21 हजारांवर दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटपकरण्यात आले.ही माहिती माहिती अधिकारातून पुढे आली.परंतु यातील किती प्रमाणपत्र बोगस आहेत?हा संशोधनाचा विषय आहे.याबाबत माहिती देण्यास रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करीत आहे.याकडे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राकडे लक्ष देणार का?असा प्रश्न विचारला जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 8 वर्षांमध्ये जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाकडून तब्बल 21 हजाराहून अधिक दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासंदर्भात सविस्तर माहिती मागवली असता, जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून जे पत्र प्राप्त झाले, त्यामध्ये एक प्रकारे जिल्हा रुग्णालयाकडून टाळाटाळ करण्यात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नेमकी ही टाळाटाळ कशासाठी हा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.
जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार स्वावलंबन संगणक प्रणालीद्वारे शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार दिव्यांग बोर्डाकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आलेल्या अर्जांची छाननी केली जाते. या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक असतात, तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य, तसेच संबंधित विषयातील विशेषज्ञ हे सदस्य म्हणून कामकाज पाहतात.
दिव्यांग बोर्डाकडे दि.1जानेवारी 2016 ते 12 जुलै 2024 या साडेआठ वर्षांच्या कालावधीत एकूण 21 हजार 479 दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या या माहितीमध्ये मुळात त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी एकूण किती अर्ज गेल्या साडेआठ वर्षांत आले होते आणि त्यातील किती अर्ज हे वैद्यकीय तपासणीनंतर मंजूर करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले, याची माहिती मात्र रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या उत्तरात हेही म्हटले आहे की, ज्यांना-ज्यांना दिव्यांग प्रमाणत्र वाटप केले आहे, त्या सर्वांना माहिती अधिकारात माहिती देण्याबाबत अवगत करणे गरजेचे आहे आणि एव्हढ्या लोकांना याबाबत अवगत करणे शक्य नाही, असा बचावही यामध्ये करण्यात आलेला आहे.
मुळातच जिल्हा सामान्य रुग्णालय हे भ्रष्टाचाराचा एक मोठा अड्डा कसे बनले आहे, याची सगळी काही गाथा
‘हॅलो बुलढाणा’ पुढे आणणार आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरव्यवहार झालेला आहे. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सांनी तसेच इतर अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठा मलिदा लाटलेला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या गळ्यात नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री पदाची माळ पडलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे अनेक वर्षांपासून बुलढाण्याचे खासदारदेखील आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांतील जिल्हा रुग्णालयात बोकाळलेला भ्रष्टाचारदेखील पाहिलेला आहे. या स्थितीत जिल्हा रुग्णालयात बोकाळलेला हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रतापराव जाधव आगामी काळात काय प्रयत्न करणार आहेत, याबाबतही राज्यमंत्र्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!