लोणार (हॅलो बुलढाणा) धान्य असूनही लाभार्थ्यांना ते सर्वर डाऊन मुळे वितरित करण्यात येत नाही. ई पॉस मशीन संदर्भात शासनाने
सकारात्मक उपयोजना न केल्यामुळे पाच ऑगस्टला राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार इ पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात साधारण 52 हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण नंतर २०१८ पासून ई पॉस मशीनद्वारे धन्य वितरित करीत आहे परंतु मागील दोन महिन्यापासून ईपॉस मशीन वितरण कामांना सातत्याने होणारे सर्व्हर डाऊनमुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करण्यासाठी अडचण येत आहे. लाभार्थी शिधापत्रिका धारकांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत राहावे लागते. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध असून देखील वितरण करू शकत नाही.याबाबत तालुका,जिल्हास्तर,राज्यस्तरावर तक्रारीत देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची सकारात्मक उपयोजना न झाल्यामुळे पुढील काळात सर्व स्वस्त धान्य दुकानदार आपल्या तहसील कार्यालयात ई पॉस मशीन जमा करतील असा निर्णय घेण्यात आला. 25 जुलै माननीय प्रधान सचिव साहेबांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कोणता तोडगा न निघाल्याने महासंघाला नाईलाजाने निर्णय घेणे भाग पडत आहे.शासनाकडून मशीनच्या संदर्भात निर्णय न झाल्यास जुलै महिन्याचे वितरण झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी आपल्या इ पॉस मशीन आपल्या तहसील कार्यात जमा करण्यात येईल. असे निवेदन आज लोणार तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी स्वस्त धान्य संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवानराव कोकाटे,अ.नसीम अ.रहीम,संजय पवार,सतिष तेजनकर,मुळे, अंभोरे आदी सदस्य उपस्थित होते.