बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अस्मानी व नैसर्गिक संकटाचा ससेमिरा शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागला आहे.दरम्यान मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रा.नरेंद्र खेडेकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात तहसीलवर आज उबाठा शिवसेनाचा मोर्चा धडकला.
पी एम किसान योजना, ठिबक व तुषार अनुदान, पीक विमा, पंतप्रधान आवास योजना यासह अनेक प्रश्नासंदर्भात आज दिनांक २९ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर व जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देण्यासाठी मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा या मागण्यांची दखल न घेतल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई बढे, उप जिल्हाप्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, युवा सेना तालुका प्रमुख ओमप्रकाश बोर्डे, की से ता प्र सुधाकर सुरडकर, गजानन कुकडे, सागर घोंगटे, संदीप पाटील, भागवत शिकारे,राजु बोरसे, यांच्या सह मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधव शिवसेना, महीला आघाडी, युवासेना, किसान सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.