साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जन येथील सुर्योदय वाईन बारचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी विदेशी दारुसह नगदी ऐवज मिळून ३ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे . उपरोक्त घटना ही २७ जुलै रोजी रात्री घडली.
बार मालक दिलीप रामकृष्ण शिंगणे यांनी तंक्रार दिली की, सखखरखेर्डा ते शेंदुर्जन रोडवर शेंदुर्जन येथे सुर्योदय वाईन बार असून सकाळी हरिभाऊ शिंगणे हे सकाळी शेतात जात असताना वाईन बारचे शटर उघडे दिसले . त्यांनी तत्काळ गजानन शिंगणे आणि चेतन शिंगणे यांना माहिती दिली . शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले . दिलीप शिंगणे यांनी आत जाऊन पाहणी केली असता विदेशी दारु ठेवलेल्या खोलीचे कुलूप तोडून आतील इ़ग्लीश दारू किंमत ३ लाख ५७ हजार रुपये , गल्यातील रोख रक्कम १२ हजार रुपये , सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन किंमत ३ हजार रुपये असा एकूण ३ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे . दिलीप शिंगणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३३४ (१) , ३०५ बी एन एस २०२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय रवी सानप करीत आहेत.










