7.5 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

सत्ताकारण! “मनसेची माणसे..अशिक्षित, उपेक्षित, दुर्लक्षित तरीही प्रामाणिक!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ राजेंद्र घोराडे) “हॅलो बुलढाणा ‘ रविवारीय विशेष’ मध्ये मनसेचे माणसे लिहतांना काही चेहरे एकदम डोळ्यासमोर तरळून जातात.ही तीच माणसे आहेत ज्यांनी “साहेबांच्या” एका आदेशा खातर ना कायद्याची पर्वा केली, ना कुटुंबाची,ना समाजाची.

कुटुंबासाठी ही पोरं नेहमीच नालायक कार्टी होती,त्यात भर यांच्या रोजच्या भांडणाची,”खायला नाही दाना तरी हा बाबू नेहमीच उताणा”.त्यातून यांच्या आर्थिक क्षमता अशा ना, ना धड वर्गणी न धड देणगी,मग एका गाडीवर तीन-चार जण बसायचे आणि दोन चहा,दोन खाली ग्लास असे चार जणांनी चहा प्यायचा..

2009 ला राज ठाकरेंनी मनसेच्या नावावर तेरा विधानसभा आमदार निवडून आणले,निवडून आलेल्या पैकी एकही राज ठाकरेंकडे टिकला नाही.कार्यकर्ते मात्र तिथेच राहिले,राज ठाकरेंनी वेळोवेळी भूमिका बदलल्या, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना लॉन्च केलं आणि धडक मनसेमध्ये दोन नंबरच्या पदावर नेऊन बसवल,कार्यकर्ते मात्र तिथेच राहिले.

राज ठाकरे कृष्णकुंजावरून ‘जाणवे’ घालून पाच मजलीी शिवतीर्थावर सहकुटुंब राहायला गेले, कार्यकर्ते मात्र तिथेच राहिले.

राज ठाकरेंनी या 15 वर्षात काय आर्थिक क्षमता कमावली किती पैसे कमावले त्यांच्या मुलांनी कुठे,कसे, किती इस्टेट कमावली हे सांगणे या लेखाचा उद्देश नाही,तर 2024 आल्यानंतरही राज ठाकरेच्या, मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवाराला विधानसभा निवडणुकीमध्ये थोड्या गंभीररित्या कोणी घेऊ नयेे एवढी उपेक्षा होत असताना राज ठाकरे,250 जागांच्या वल्गना करत असतील तर त्याला काही अर्थ नाही.

चिखली मध्ये शिकत असताना विद्यार्थी व विद्यार्थी संघटनेची काहीही काम असेल तर एका फोन कॉल वर उपलब्ध होणारे शैलेश कापसे या युवकाला चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक युवक प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुटुंबाचा एक भाग समजतो हे भाग्य अनेक राजपुत्रांनाही मिळत नाही,साहेबांनी कितीही भूमिका बदलल्या तरी तो पक्षादेश मानून आपल्याला कवडीचीही किंमत न देणाऱ्या लोकांचा प्रचार करणारे गणेश बरबडे,बुलढाणा तालुका मनसेची धुरा एक हाती पेलून धरणारे अमोल रिंढे अशी कित्येक नावे सांगता येतील,तरीही ही लोक आमचा पक्ष राज ठाकरे,आमच चिन्ह राज ठाकरे, आमचा उमेदवार देखील राज ठाकरे अशा पोकळ घोषणांना स्वतःच्या अस्तित्वाने, स्वतःच्या कृत्याने वजन प्राप्त करून देत आहेत.अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना किमान एक वर्षा अगोदरच जर,पक्षाने लढा असा आदेश दिला असता तर मतदारसंघातील प्रत्येक घरात जाऊन मत ओढून आणण्याची क्षमता या कार्यकर्त्यांमध्ये आहे.पण पक्षच वारंवार भूमिका बदलत असल्याने,नेत्याकडून (सर्वपक्षीय) मुद्दाम दुर्लक्षित करण्यात आलेले हे नवीन नेतृत्व समाजाकडूनही उपेक्षित होत आहे.

वर्णनात प्रथम शब्द अशिक्षित आला आहे,हे वाचून अनेकांच्या भुवया वर उंचावल्याशिवाय राहणार नाहीत,पण सुशिक्षितांच्या घाणेरड्या व्याख्येत ही मुलं कुठेच बसत नाहीत,ती अशिक्षितांसारखी अजूनही प्रत्येकाला मदत करतात, अशिक्षिता सारखी अजूनही मित्रांना जपतात, स्वतःच्या कुटुंबाला जपतात, नातेवाईकांना मान देतात,गणपती,लग्नात दहीहंडीत नाचायला,मित्रासाठी भांडणे करायला,भांडणे मिटवायला हीच असतात पण शेवटी पत्रावळ्या उचलायला देखील हिच असतात.सुशिक्षितांना हे परवडणार नाही आणि या गोष्टी ते करूही शकणार नाहीत म्हणून ही अशी अशिक्षित कार्टी… नवीन नेतृत्व म्हणून उदयास येण्याच्या एक नंबर लायकीचे आहेत,सगळीच चांगली नसतील पण सगळीच वाईटही नाहीत,कदाचित समाजाने आपला चष्मा बदलण्याची गरज आहे त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न..

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!