9.1 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस रस्त्यावर! -जिल्हा कार्यालयासमोर केली निदर्शने

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातसह राज्यातील शेतकऱ्याला आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.शेतमालाला भाव नाही,शेतीला लागणारे बी बियाणे,खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत.कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे.परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे.मागील 6 महिन्यात राज्यात 1727 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.हे महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही.

राज्यातील शेतकऱ्यांची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून राज्य शासनाने कर्जमाफी करण्याची गरज आहे. आसमानी व सुलतानी संकटामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तसेच संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी आज 26 जुलैला दुपारी 3 वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर भरपावसात काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील तायडे, बुलढाणा शहर अध्यक्ष दत्ता काकास यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली तसेच आपली मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!