बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा येथील रहिवासी तसेच विविध कार्यालयात विविध प्रकारच्या माहित्या माहितीचा अधिकारांतर्गत मागणारे विनोद मधुकर बोरकर यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कागदपत्रांची फाडाफाड केली व कर्मचारी समाधान जाधव याना चावा घेतल्याप्रकरणी आरोपीची बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे ०३. ०३ .२०२२२ रोजी नायब तहसीलदार अमरसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १५१ / २०२२ नोंदविण्यात आला होता. सादर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपप्रत्र ज़िल्हा न्यायधीश बुलढाणा येथे सादर करण्यात आले होते. सादर प्रकरणात ६ साक्षी पुरावे तपासण्यात आले. परंतु तपासातील त्रुटी व संशयाचा आधारे प्रमुख सत्र न्यायाधीश बुलढाणा श्री. एस. सी. खटी साहेब यांनी विनोद बोरकर यांचे सदर आरोपातून दिनांक २५ .० ७ . २०२४ रोजी निर्दोष मुकतात केली. सादर प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. प्रवीण वाघमारे याच्या मार्फत कामकाज पाहण्यात आले व युक्तिवाद करण्यात आले.