spot_img
spot_img

मामाचं नव्हे भ्रष्टाचारांचे ‘पत्र हरवलं!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘मामांचे पत्र हरविले तेच आम्हाला सापडले!’असे आपण लहानपणी ऐकले असेल परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार करणाऱ्यांचे पत्र सुद्धा गाहाळ झाले आहे. परंतु ते लोकआयुक्तांचे पत्र आहे. मात्र कुठे दबले याला कळायला मार्ग नाही. कारण यामध्ये दोषींचे चेहरे समोर येणार आहेत.

भ्रष्टाचार करणे अलीकडे सोपे झाले असे वाटते. कारण जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करूनही दोषी अजून, हे मस्त जिंदगी जगत आहेत. चांगले जीवन जगले पाहिजे.. आणि कर्म ही तसेच चांगले केले पाहिजे.. परंतु या दोषींनी जिल्हा रुग्णालयाचे नाव देशात खराब करून ठेवले. यांच्या मागे कोणते वरिष्ठ अधिकारी आहेत? का यांना एवढी मुभा? हा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. या प्रकरणात लोकआयुक्तांकडून 10 जून 2024 रोजी उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र देऊन ही अद्याप पर्यंत गुन्हे दाखल का करण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमच्या माहितीप्रमाणे या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात दहा ते बारा अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. परंतु तारीख पे तारीख मिळत असल्याने हे गुन्हेगार सध्यातरी सुटकेचा श्वास घेत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!