बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ग्रामीण भागात तब्बल १६ कोटी ८५ लक्ष रुपयांचे विकास कामांचा धडाका आमदार संजय गायकवाड यांनी लावला आहे.
बुलढाग्रामीण भागात १६ कोटी ८५ लक्ष रुपयांचे विकासणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या विकास कामांच्या धडाडी कार्यशैलीमुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट होत आहे, मतदारसंघांमध्ये चहूबाजूंनी विकासाची गंगा वाहत आहे.
आज दिनांक २२ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील मौजे नांद्राकोळी येथे विविध विकासकामांचा ०१ कोटी ३८ लक्ष रुपयाचा विकास कामाचा भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.मौजे कोलवड तालुका जिल्हा बुलढाणा येथे ०२ कोटी रुपये किमतीच्या विकास कामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.मौजे तांदुळवाडी येथे विविध विकास कामांचा ०१ कोटी ८४ लक्ष रुपये किंमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा घेण्यात आला
मौजे हतेडी बु. तालुका जिल्हा बुलढाणा येथे ०१ कोटी ८० लाख रुपये किमतीच्या विविध विकासाकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा देखील पार पडला.मौजे हतेडी खु. तालुका जिल्हा बुलढाणा येथे ०१ कोटी १८ लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.. तसेच मौजे अंभोडा येथे ०३ कोटी ६५ लक्ष रुपये किमतीच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते हे कार्यक्रम संपन्न झाले. शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तथा प्रत्येक गावातील शिवसेना युवासेनेचे शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.