बुलडाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्ततेतुन मुक्त व्हावा हे माझे स्वप्न आहे त्याकरता आपल्याला हवे तेवढे सहकार्य नक्कीच मी करेल अशी ग्वाही असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नागपूर येथे झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात दिली.
नागपुर येथे राहत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकच्या वतीने आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन नागपूर यांच्यावतीने केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार समारंभ व स्नेह मेळाव्याचे आयोजन नागपुर येथील जवाहर वसतिगृह सिव्हिल लाईन येथे नुकताच घेण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी ,माजी खासदार अजय संचेती,शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने,बुलढाणा अर्बन परिवाराचे
संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक बबनराव तायवाडे,अँड. पुरुषोत्तम पाटील,श्री. संजय मारोडे,डॉ. मोहन येंडे, सौ.लिना पाटील,अंनत
भारसाकळे, देवेंद्र केदार उपस्थित होते
या कार्यक्रमात केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना केद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले की जिगाव प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे तो कार्यान्वित व्हावा म्हणून त्याकरिता 4000 कोटी रुपये मंजूर केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. जिल्हयाचा विकास झपाट्याने व्हावा म्हणून सुमारे 670 किलोमीटर लांबीचे महामार्ग जिल्ह्यात तयार केल्याचे त्यांनी सांगितले जलसंवर्धन खात्याचा मंत्री असताना आपण बुलडाणा पॉर्टन नावाने स्वतंत्र जलस्त्रोत प्रकल्प राबविला रस्ते तयार करतांना छोट्या तलावांची निमिती केली त्याचे फायदे निश्चितच समोर येत असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगीतले . सिंचनाचा अभाव असल्याने आपण नदी जोड प्रकल्पासाठी केलेले प्रयत्न आता हा सिंचन प्रकल्प कार्यान्वित होण्यच्या मार्गावर आहे यातून परिसर सुजलाम सुफलाम होईल असेही गडकरी म्हणाले. सत्काराला उत्तर देताना प्रतापराव जाधव म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळात माझा समावेश हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिफारस केल्यानेच झाला. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ग्रामीण जनतेची सेवा झाली पाहिजे असं खातं आपल्याला मिळाल पाहिजे अशी मनोमन इच्छा होती आरोग्य सारखं जनसामान्याची सेवा करणारे खात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले विकासात्मक कामात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आपल्यावर आणि बुलढाणा जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिल्याचेही केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगून त्यांनी केलेल्या सहकार्यातून बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प मार्गी लागले आहेत असेही ते म्हणाले. यापुढे पुढील काळात जिल्ह्याचा वेगाने विकास होईल अशी भूमिका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी मांडली सोबत नागपूर येथे सत्कार करणाऱ्या बुलडाणेकर नागरिक मंडळी यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळचे सर्व पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.