spot_img
spot_img

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या अवमानाचा जिल्हा काँग्रेसकडून निषेध! प्रकाश पाटील म्हणाले… ‘पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचा प्रकार!’ बुलढाण्यातील जयस्तंभ चौकातही निषेध!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेदांना निश्चितच स्थान आहे. मात्र, एखाद्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी पुस्तक फाडणे, साहित्याची विटंबना करणे आणि विचारांचा अवमान करणे ही कृती लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी आहे. सोनिया गांधी यांच्या विचारांशी मतभेद असतील तर त्यांचे ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक वाचून त्यातील मुद्द्यांवर वैचारिक चर्चा कराव्यात. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न हा वैचारिक दिवाळखोरीचा प्रकार असल्याची टीका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली.

काँग्रेस नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रती फाडून अवमान करणाऱ्या प्रवृत्तींचा बुलढाणा जिल्हा काँग्रेसकडून शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी प्रत्येक तालुक्यात निषेध करण्यात आला. जळगाव जामोद येथे झालेल्या आंदोलनात प्रकाश पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर, पंचायतराजचे प्रदेश प्रतिनिधी अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष अँड भालेराव, शहराध्यक्ष अमर पाचपोर, बाबूबाई जमदार, अचक्हा हमीब खॉ, अजय राजपूत यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्य़ेने उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, सोनिया गांधी यांच्या या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अवघ्या आठवडाभरात दोन लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाल्याची माहिती प्रकाशकांकडून देण्यात आली आहे. विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्याच दहा मिनिटांत १५ हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली. त्यामुळे पुस्तक फाडणाऱ्यांच्या कृतीने पुस्तकाचे नुकसान होण्याऐवजी त्याची चर्चा आणि वाचकांची उत्सुकताच वाढणार असल्याचा विश्वास प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला.

▪️बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात निषेध!

बुलढाणा तालुका काँग्रेसच्या वतीने शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निषेध करण्यात आला. बुलढाण्यात आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, संजय निरुपम, शायना एनसी आणि आनंद दुबे यांचा जाहीर निषेध करीत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष पंडितराव चाटे, बाळासाहेब भोंडे, चित्रांगण खंडारे, दिपक रिंढे, अनिल वारे, जिल्हा कार्यालयीन सचिव विठ्ठलराव चव्हाण, भारतभाऊ ठेंग, डॉ. पुरुषोत्तम देवकर, तुषार खरे, प्रभाकर पाटील वाघ, निवृत्तीभाऊ पवार, मोतीराम भाऊ लवंगे, दिलीप राजपूत, रविंद्रभाऊ भाकरे, भास्करराव जुमडे, विशाल सावळे, जीवनदादा जाधव, राजेश जाधव यांची उपस्थिती होती.

▪️सोनिया गांधीचे योगदान पुसता येणार नाही!

सोनिया गांधी यांचा त्याग, संघर्ष आणि देशाप्रती असलेले समर्पण त्यांच्या जीवनप्रवासातून अधोरेखित होते. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पुस्तकाचा अवमान करून त्यांचे योगदान पुसता येणार नाही. विचारांना विचारांनी उत्तर द्या, पुस्तकांची पाने फाडून संस्कृतीचे प्रदर्शन करू नका, असा सडेतोड संदेश देत बुलढाणा तालुका काँग्रेसने या आंदोलनातून निषेध नोंदविला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!