spot_img
spot_img

BREAKING! रात्री एक वाजता उदयनगरात नेमकं काय घडलं? बिअरच्या ट्रकची धडक, काळी-पिवळी थेट मंदिरावर… चालक-हेल्पर जागीच ठार!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील उदयनगर येथे काल रात्री एक वाजेच्या सुमारास बिअरने भरलेल्या मालवाहू ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काळी-पिवळीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे काळी-पिवळी थेट हनुमान मंदिरावर आदळली. या भीषण अपघातात ट्रकचालक आणि हेल्परचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्याच्या कडेला उभे वाहन आणि मंदिरापर्यंत पोहोचलेली धडकेची तीव्रता या अपघाताचे भीषण स्वरूप अधोरेखित करते. बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतांमध्ये गणेश गणपतजी कातमाल (वय ३८) आणि निलेश रामभाऊ मडकाम (वय २८), दोघेही रा. शिलेवाडा, खापरखेडा, नागपूर, यांचा समावेश आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळताच ‘हॅलो बुलढाणा’ या भीषण अपघाताचे संपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवेल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!