spot_img
spot_img

काय सांगता? समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली १९ किलो गांजा! ७ जण ताब्यात; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर ते जानेफळ रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या टोळीवर मेहकर पोलिसांनी नियोजनबद्ध आणि यशस्वी छापा टाकला. या कारवाईत १९.६६० किलो गांजा, ईर्टिका कारसह एकूण १९ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रानुसार,दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी ईर्टिका चारचाकी वाहनातून काही इसम आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्रीच्या उद्देशाने मेहकर, जानेफळ, डोंगाव परिसरात घेऊन येणार आहेत.माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मेहकर ते जानेफळ रोडवरील गौडाळा गावाजवळील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली छापा टाकला.

त्यावेळी ईर्टिका कार (क्र. MH 28 CC 9884) ची शासकीय पंचांसमक्ष झडती घेतली असता, कारच्या मागील डिक्कीमध्ये दोन सुटकेसमध्ये १९.६६० कि. ग्रॅ. गांजा मिळून आला. आरोपींनी तो गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. जप्त मुद्देमालामध्ये
गांजा १९.६६० किलो, ईर्टिका कार MH 28 CC 9884, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण १९,१३,००० रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे आरोपींनी स्वतःच्या ताब्यात गांजा बाळगल्याचे, विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचे आढळले.
महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, पोस्टे मेहकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध पोस्टे मेहकर येथे गुन्हा क्र. 763/2026 कलम 8(क), 20(ब)(ii)(क), 22 एन.डी.पी.एस. कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

▪️ताब्यात घेतलेले आरोपी..

1) किरण विष्णू चांदणे (३०) चालक, रा. मुथेकार, ता. मेहकर
2) योगेश वस्ती फानभरे (२६) रा. पेंडगाव, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम
3) विक्की रमेश दामाडे (२०) रा. इंदिरानगर, जानेफळ, ता. मेहकर,
4) अभिषेक नारायण शिंदे (२१) रा. इंदिरानगर, जानेफळ, ता. मेहकर,
5) संदीप आत्माराम दातीर (३६) रा. अहिल्यानगर, जानेफळ, ता. मेहकर,
6) सचिन भगवान फुके (२०) रा. अहिल्यानगर, जानेफळ, ता. मेहकर
7) कु. रिया अमोल साठे (१९) रा. शासीनगर, कोथरूड, ता. जि. पुणे

▪️कारवाईत सहभाग…

सदरची कारवाई मा. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा, मा. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, मा. संतोष खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अवचार, महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, पोउपनि गणेश कड, सपोउनि राजेंद्र काळे, सपोउनि सुखदेव ठाकरे, सपोउनि श्रीकृष्ण गवई, पोहेकॉ लक्ष्मण कटक, पोहेकॉ प्रभाकर शिवणकर, पोहेकॉ इब्राहिम परसुवाले, पोहेकॉ केशव गायकवाड, पोहेकॉ मोहनमद परसुवाले, पोहेकॉ नितीन फुके, पोहेकॉ विलास झेंडे, पोकॉ गणेश वैद्य, पोकॉ शरद कपसे, पोकॉ रविंद्र चिखले, पोकॉ संदीप भोंडाणे, शिवाजी चिम पोस्टे मेहकर व पोकॉ कैलास ठोंबरे, सायबर बुलढाणा यांनी सहभाग घेतला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!