चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) सहा महिन्यांनंतर झालेल्या चिखली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले. अजेंड्यावर २१ विषय असताना एकही विषय वाचून दाखवला गेला नाही आणि अवघ्या १० मिनिटांत सभा आटोपली, असा आरोप काँग्रेसने केला. ‘मंजूर, मंजूर, मंजूर’ म्हणत नगराध्यक्ष सभागृहाबाहेर पडले, असा आरोप विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार यांनी केला. कॅबिनच्या मुद्द्यावरूनही जोरदार वाद झाला.
शहरात पाणीटंचाई असताना हा विषय अजेंड्यावर का घेतला नाही, असा सवाल काँग्रेस नगरसेवकांनी केला. दर आकारणी नेमकी कशी होणार, हे अजूनही समजलेले नाही. बॉम्बे मार्केट बीओटी तत्त्वावर देण्याचा महत्त्वाचा प्रस्तावही अजेंड्यावर होता, मात्र त्यावर चर्चा झाली नाही, असे नगरसेवक निलेश गावंडे म्हणाले.
काँग्रेस शहराध्यक्ष गोपाल देव्हडे, गटनेत्या मीनल गावंडे यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी सभेच्या कामकाजावर आक्षेप घेतला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रश्नांना सामोरे जावे लागू नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभा आटोपली, असा आरोपही काँग्रेस नगरसेवकांनी केला.













Total Users : 3783460