देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) १४ नोव्हेंबर २०२६
देऊळगाव राजाच्या बसस्थानक चौकात दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र आले. निमित्त होतं फराळ वाटपाचं, तर संदेश होता सेवा, समता आणि बंधुतेचा! रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि मा. रमेश आण्णा मुळे फाउंडेशन, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
आयोजकांनी चौकात जमलेल्या नागरिकांना फराळाचे वाटप केले. बसस्थानक परिसरातील या उपक्रमात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारही सहभागी झाले. दिवाळीचा आनंद नागरिकांसोबत वाटून घेत प्रेम, आपुलकी आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणे हा उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाला समाजभूषण रमेश आण्णा मुळे पाटील, बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंग जाधव, भाजप नेते डॉ. सुनील कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गिते, संतोष खांडेभराड, डॉ. दिलीप खरात आणि दिलीप काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक विकास कासारे यांच्यासह संजय हिवाळे, सदाशिव मुख्यदल, पवन साळवे, आकाश साळवे, सुधीर हिवाळे, सतीश झिने आणि अजय झिने हेही उपस्थित होते.
या वेळी स्थानिक पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला. शहराच्या बसस्थानक चौकात झालेल्या या कार्यक्रमामुळे नागरिकांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत सणाच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक डॉ. दिलीप खरात आणि दिलीप काकडे यांनी उपक्रमासाठी सहकार्य करणारे मान्यवर, पत्रकार आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले. ‘सेवा हीच प्रेरणा, समता हाच विचार आणि बंधुता हेच ध्येय!’या शब्दांत आयोजकांनी उपक्रमामागची भूमिका मांडली.













Total Users : 3783460