spot_img
spot_img

EXCLUSIVE दुष्काळाच्या झळांत नाईक नगर… मयूर निकम ‘झी २४ तास’च्या टीमसह पोहोचले, घरोघरी उजळले माणुसकीचे दिवे!कमलेश सुतारांची संकल्पना, मानसी नाईक यांची साथ… ‘उत्सव बांधिलकीचा’मधून जिजाऊंच्या भूमीत ग्रामस्थांसोबत दिवाळी!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) पाणी कुठून आणायचं? शेतीचं पुढे काय? ऐन दिवाळीतही हे प्रश्न नाईक नगरच्या अनेक कुटुंबांसमोर होते. पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींनी सणाचा उत्साह झाकोळला होता. अशा वेळी झी २४ तासची टीम सिंदखेडराजा तालुक्यातील या गावात पोहोचली. टीमने ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन दिवे लावले, आकाशकंदील टांगले आणि गोडधोड वाटत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.

 

झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या संकल्पनेतून ‘उत्सव बांधिलकीचा’ हा उपक्रम मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांत राबविण्यात आला. त्याअंतर्गत राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीच्या तालुक्यातील नाईक नगरची निवड करण्यात आली. अभिनेत्री मानसी नाईक, संपादक कमलेश सुतार आणि रिपोर्टर मयूर निकम यांच्यासह झी २४ तासच्या पथकाने गावात जाऊन या उपक्रमात भाग घेतला.

आकाशकंदील लावायला टीम थेट घराच्या दारात!

दुष्काळाचा फटका बसल्याने सणाचा खर्च भागवणंही अनेक कुटुंबांसाठी आव्हान ठरलं होतं. अशा परिस्थितीत गावात आलेल्या पाहुण्यांनी ग्रामस्थांच्या दारात दिवे लावले आणि त्यांच्यासोबत गोडधोड खाल्लं. पडद्यावर दिसणारी अभिनेत्री आणि वृत्तवाहिनीची टीम आपल्या गावात येऊन आपल्यासोबत सण साजरा करते, याचं ग्रामस्थांना अप्रूप वाटलं. आपल्या गावाची आठवण ठेवून ही मंडळी ऐन सणाला आली, याचाही त्यांना आनंद होता.

दुष्काळाच्या बातम्यांत पाणीटंचाई आणि शेतीची चिंता मांडली जाते. त्या बातम्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी या उपक्रमाने दिली. जिजाऊंच्या भूमीत झी २४ तासच्या पथकाने ही दिवाळी गावकऱ्यांच्या दारात साजरी केली. त्या दिवशी नाईक नगरात लावलेल्या आकाशकंदिलांना म्हणूनच वेगळं महत्त्व होतं. ते लावायला आलेल्या माणसांनी गावकऱ्यांसोबत सणाचा आनंदही वाटून घेतला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!