बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पोलीस स्टेशन धाड, जिल्हा बुलढाणा येथे दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दाखल गुन्हा क्रमांक ४१९/२०२६ मध्ये आरोपीच्या वतीने अॅड. दर्शन बरडे यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मा. विशेष पोक्सो न्यायालय, बुलढाणा यांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे.
प्रस्तुत प्रकरणात आरोपी विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ कलम ४ (१), ८ व १२ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ६४(१), ११५(२), ३५२, ३५१ (२), ३ (५) तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ९ व १० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.जामीन अर्जाच्या युक्तिवादा
दरम्यान अॅड. दर्शन बरडे यांनी पीडितेने प्रथम माहिती अहवालात (F.I.R.) नमूद केलेल्या बाबी, प्रकरणातील वस्तुस्थिती, घटनाक्रम आणि कायदेशीर तरतुदी यांचा ऊहापोह केला. केवळ आरोपांचे गांभीर्य विचारात न घेता प्रकरणातील वास्तविक परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि आरोपीच्या पुढील कोठडीची आवश्यकता यांचा स्वतंत्रपणे विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आरोपी तर्फे विधिज्ञ अॅड. दर्शन बरडे यांनी केलेला प्रभावी व कायदेशीरदृष्ट्या मुद्देसूद युक्तिवाद विचारात घेऊन मा. विशेष न्यायालय, बुलढाणा यांनी आरोपीस नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायालयात विधिज्ञ अॅड. दर्शन बरडे यांना याहिया खान यांनी मोलाचे सहकार्य केले.












Total Users : 3726697