मेहकर (हॅलो बुलढाणा) पिकांसाठी हक्काचं पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश आलं. पेनटाकळी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं असून, लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीला त्याचा फायदा होणार आहे.
‘तुम्ही पाणी सोडा, नाहीतर आम्ही सोडतो,’ असा इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात देण्यात आला होता. याच मागणीसाठी गजानन बोरकर यांनी उकळी येथे रात्री दोन वाजता टॉवरवर चढून आंदोलन केलं. मोर्चा, टॉवर आंदोलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. उभ्या पिकांना वेळेत पाणी मिळावं, यासाठी शेतकऱ्यांनी लावून धरलेल्या मागणीला ऐन दिवाळीत यश मिळालं. पिकांना पाणी कधी मिळणार, या चिंतेत असलेल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.











Total Users : 3725192