spot_img
spot_img

BIG NEWS! चिखली मतदारसंघाची सावळी ठरली विभागात अव्वल… अमरावती विभागाच्या पहिल्या क्रमांकावर कोरलं गावाचं नाव! सावळी ग्रामपंचायतीच्या कामगिरीवर आमदार श्वेता महालेंकडून अभिनंदनाचा वर्षाव!

चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५–२६ अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघातील सावळी ग्रामपंचायतीने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला. या पुरस्काराची रक्कम एक कोटी रुपये आहे. जलसमृद्ध अभियानातही सहभागी असलेल्या सावळीच्या या कामगिरीने संपूर्ण मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नियोजन, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि विकासकामांसाठी ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार या बळावर सावळीने विभागीय पातळीवर बाजी मारली. गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि ग्रामस्थ एकत्र आले, त्याच सामूहिक प्रयत्नांना या बहुमानाची जोड मिळाली.

आमदार श्वेता महाले यांनी या यशाबद्दल सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थांचे अभिनंदन केले. सावळीची कामगिरी चिखली मतदारसंघासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गावाने विकासाची ही वाटचाल अशीच पुढे न्यावी आणि सावळीच्या यशातून परिसरातील इतर गावांनाही प्रेरणा मिळावी, अशा सदिच्छा महाले यांनी दिल्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!