spot_img
spot_img

बालाजी नगरीत पैलवानांचा धुरळा! तासभर झुंज, तरीही कुणीच झुकेना; महिला पैलवानांनीही गाजवला आखाडा!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) आखाड्यात डावावर डाव अन् विजयासाठी जबरदस्त चढाओढ! श्री बालाजी महाराजांच्या यात्रेतील लळितोत्सवानिमित्त वैदू समाजाने गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुस्ती दंगलीने बालाजी नगरीत उत्साह भरला. तब्बल ७० वर्षांची परंपरा जपत झालेल्या या आयोजनात पैलवानांच्या चुरशीच्या लढतींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

वाशिमचा विजय वारा आणि गंगापूरचा विशाल मागे यांच्यातील अंतिम कुस्ती तब्बल तासभर रंगली. दोघांनीही ताकद पणाला लावली; मात्र निकाल लागला नाही. अखेर पंचांच्या मध्यस्थीने दोघांना समान बक्षीस देण्याचा निर्णय झाला.

छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि कन्नडच्या महिला पैलवानांनीही आखाड्यात कौशल्य दाखवत दंगलीची रंगत वाढवली.

प्रतापराव जाधव, मनोज कायंदे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत आखाड्याचे उद्घाटन झाले. अंतिम कुस्ती अरुण मोकळ आणि संदीप नागरे यांच्या हस्ते लावण्यात आली. मान्यवरांनी मैदानी खेळ, व्यायाम आणि गावाच्या एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. चुरशीच्या कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. वैदू समाजाने जपलेल्या या परंपरेतून नव्या पिढीला कुस्तीची प्रेरणा मिळाली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!