चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) आज दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी चार वाजेच्या दरम्यानबसस्थानकात प्रवेश करणाऱ्या बसचा धक्का लागल्याने सुमारे ७५ वर्षीय महिला बसखाली आली. या अपघातात महिलेचा हात बसच्या चाकाखाली सापडला. निर्मला आनंदराव देशमुख, रा. धोत्रा भंगोजी, ता. चिखली, असे जखमी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी येथून शेगावकडे जाणारी MH14LX5064 बार्शी डेपोची बस चिखली बसस्थानकात प्रवेश करत असताना हा अपघात घडला. बसचालकाचे नाव एस. डी. बांगर असल्याची माहिती मिळाली आहे. बसचा धक्का बसल्यानंतर देशमुख बसखाली आल्या आणि त्यांचा हात चाकाखाली सापडला.
घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शेख शमशेर आणि कपिल लोखंडे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोघांनी महिलेला बसखालून बाहेर काढले आणि जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले.
या अपघाताने बसस्थानकातील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसची ये-जा आणि प्रवाशांची पायी वर्दळ असलेल्या परिसरात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे





Total Users : 3677859