spot_img
spot_img

आरोग्यसेवेचा धडाका! १५४ रुग्णांची तपासणी; १६ जणांना पुढील तपासणीसाठी जामनेरला हलवले!

मोताळा (हॅलो बुलढाणा) महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर आणि एकविरा ग्रुप, कोऱ्हाळा बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६ रुग्णांना पुढील तपासणीसाठी जामनेरच्या रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

यावेळी मंदार बाहेकार, मुन्नाजी बेंडवल, कुस्तूप राजशीखरे पाटील, डॉ. धरमचंद भंडारी, डॉ. अनिल पाटील, दीपक पाटील, दिलीप लांडगे, निलेश इंगळे, विश्वास वाघ, विनोद शेवाळे, प्रवीण शेवाळे, ऋषी शेवाळे, वैभव पांढरे, विवेक ढोले, विनोद वाघ, मधुकर सुरळकर, पवार साहेब व ग्रामस्थ उपस्थित होते. आरोग्य तपासणीच्या या उपक्रमातून ग्रामीण रुग्णांना वैद्यकीय सेवेचा थेट लाभ मिळाला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!