spot_img
spot_img

बुलढाणेकरांना आता 7 व्या दिवशी पाणी, पाणी वाया घालवणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई होणार – आ. संजय गायकवाड यांचा इशारा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरासह ग्रामीण भागात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी आज नगरपालिकेत आढावा बैठक घेतली.

सुंदरखेड परिसरात काही ठिकाणी 7 ते 12 तास पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर गायकवाड यांनी सर्व ग्रामपंचायतींना कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. यापुढे कोणत्याही गावाला 50 मिनिटांपेक्षा जास्त पाणी सोडता येणार नाही. बुलढाणा शहर आणि ग्रामीण भागात आता 7 व्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. 30-32 गावांचे पाणी ऑपरेटिंगचे काम आता थेट नगरपालिकेने ताब्यात घेतले असून कोणालाही मनमानी पद्धतीने पाणी सोडता येणार नाही. प्रति व्यक्ती 55 लिटर ऐवजी 10% लॉस धरून 65 लिटर पाणी दिले जाईल, त्यापेक्षा जास्त पाणी दिले जाणार नाही. ज्या ग्रामपंचायती पाणी गळती थांबवणार नाहीत, बेकायदेशीर नळ कनेक्शनवर कारवाई करणार नाहीत, त्यांना पाणी बंद केले जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सस्पेंशनची कारवाई केली जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!