spot_img
spot_img

EXCLUSIVE कुणासाठी ‘बाबा’, कुणासाठी ‘महाराज’; भुकेल्यांसाठी मात्र ‘अन्नदाता’! मलकापूर पांग्र्यात दर शुक्रवारी २५० ते ३०० गरजूंच्या दारी माणुसकीचा डबा!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) भुकेच्या वेदनेवर माणुसकीची फुंकर घालत मलकापूर पांग्रा येथे साबीर बाबा साहब उर्फ महाराज यांनी सेवाभावाचा आदर्श उभा केला आहे. हजरत कासीम शाह बाबांच्या नावाने गेल्या तीन वर्षांपासून दर शुक्रवारी २५० ते ३०० गरीब, गरजू, दिव्यांग आणि वृद्धांना घरपोच मोफत जेवण पोहोचवले जाते.

गावासह परिसरातील गरजूंची यादी तयार करून जेवणाच्या वेळेत त्यांच्या दारात डबा दिला जातो. स्वच्छ, पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था केली जाते. महिला स्वयंस्फूर्तीने पोळ्या बनवतात, तर तरुण स्वयंसेवक डबे घराघरांत पोहोचवतात.अनेक लाभार्थ्यांना मदत करणाऱ्याचे नावही माहीत नसते; मात्र त्यांच्या पोटाला अन्नाचा आधार नियमित मिळतो.

या उपक्रमाचा खर्च साबीर बाबा उचलतात. दानशूर व्यक्तीही योगदान देतात. मुस्लिम समाजात ‘बाबा’, तर हिंदू समाजात ‘महाराज’ म्हणून परिचित असलेल्या साबीर बाबांच्या कार्यात तरुण उत्साहाने सहभागी होतात. अन्नदानातून सामाजिक एकोप्याचाही संदेश दिला जात आहे. स्वयंपाकापासून वितरणापर्यंत सेवाभाव जपणाऱ्या या हातांनी गावात माणुसकीचे नाते आणखी घट्ट केले आहे.

“कासीम शाह बाबांच्या आशीर्वादाने हे कार्य सुरू आहे. भविष्यात अधिक गरजूंपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे,” असे साबीर बाबा सांगतात.भुकेल्याच्या ताटात अन्न आणि चेहऱ्यावर समाधान आणणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!