बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी आपले उमेदवार मैदानात उतरविणार आहे, असा निर्धार आज घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केला आहे.
येथे भीम आर्मी जिल्हा कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्धार करण्यात आला. नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष जितेंद्र खंडेराव, सुरेश जाधव, अर्जुन खरात, बाला राऊत, अनिल जवरे ,सतीश गुरचवळे, अमोल इंगळे, संजय वानखेडे, अनिल पवार, राजू मोरे, कैलास खिल्लारे, विजय गजभिये, शेख गुलाम अशरफ, किरण पवार, समाधान पवार, मोहन सरकटे, कडूबा पैठणे,विजय पवार,सत्यपाल तायडे, समाधान पवार, रतन पवार, शांताराम दामोदर, राजू गवई, भीमराव गरुडे, विशाल साळवे, मिलिंद यमनेरे, अजय गोरे, अजय गायकवाड, बापूंना चोपडे, भावेश चोके, संतोष वाकोडे, नंदकिशोर इंगळे, रोशन शिखरे, सत्यपाल तायडे, संतोष हिवराळे, रॉबिन शिरसाट, गोपाल काकडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️ भीम आर्मी ने घेतली शपथ!
शिक्षण ,आरोग्य, रोजगार, संरक्षण सह सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी भीम आर्मी सदैव कार्यरत राहील. जिथे कमी तिथे भीम आर्मी या पद्धतीने सदैव कार्य समाजासाठी करेल. अशी शपथ भीम आर्मीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली.