बुलढाणा (हॅलो बुलढाणा) श्री गजानन महाराज संस्थान, शेगांसह श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा झाला.
आषाढी एकादशीला श्रींचे मंदिरात १ लाखाचे वर भाविकांनी श्रींचे समाधि दर्शन घेतले.३५ हजारावर वारकरी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीचे पर्वावर श्री क्षेत्र पंढरपूर शाखे व्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये नवमी, दशमी, एकादशी व बारस या कालावधीत २ लाख ५० हजारावर भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत करण्यात आला. वारीनिमित्त पंढरपूर शाखेत आलेल्या ४९ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ४६ भजनी दिंड्यांना भजनी साहित्यासह श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक फिरते रूग्णालयाचे माध्यमातून ३० हजार भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.आतापर्यंत श्री संस्थेव्दारा शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक,गुजरात,
मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश,उत्तराखंड, तेलंगणा अशा ९ राज्यामधील ७६ जिल्ह्यातून आलेल्या २० हजार २० गावांना भजनी साहित्य व श्री संत वाङमयाचे वितरण करण्यात आले आहे.
▪️२१ जुलैला पालखीचे प्रस्थान!
श्रींचे पालखीचे आषाढ रविवार २१ जुलै २०२४ रोजी सकाळी काला झाल्यावर श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगांव करीता प्रस्थान होईल. श्रींची पालखी करकंब, भगवान बार्शी, बीड, गेवराई, जालना, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, जानेफळ, खामगांव या मार्गाने सुमारे ५५० कि.मी. चा प्रवास करून श्रावण रविवार ११ ऑगस्ट, २०२४ रोजी शेगांव येथे आगमन होईल.