मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) समृद्धी महामार्गावर ट्रकचालकाला बेदम मारहाण करून कांद्यासह तब्बल 36 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवल्याच्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. डोणगाव पोलिसांनी या गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली MH-15-HU-9004 क्रमांकाची स्कोडा स्लाव्हिया कार ताब्यात घेतली असून, या कारमध्ये चक्क ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेली पाटी आढळल्याची माहिती समोर आली आहे.
या पाटीमुळे संपूर्ण प्रकरणाला आता वेगळेच गंभीर वळण मिळाले आहे. ही पाटी नेमकी कुणाची? ती कारमध्ये का ठेवण्यात आली होती? तिचा वापर पोलिस किंवा टोल तपासणीपासून बचाव करण्यासाठी केला जात होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात गौरव पानसरे, विषवजीत ठोमसे, तेजस ठोमसे आणि अशुदेब दास या चौघांना अटक करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र शासन’ पाटीचा या गुन्ह्याशी नेमका काय संबंध आहे, याचाही डोणगाव पोलीस कसून तपास करीत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार API इंगोले करीत आहेत











Total Users : 3520485