spot_img
spot_img

BIG BREAKING | निवेदन हातात पडताच पालकमंत्री मकरंद आबांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला! कलेक्टरांना तातडीची सूचना अन् सिंदखेडराजाच्या बाप्पांसाठी रात्री १२ पर्यंतचा आदेश!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) सिंदखेडराजाच्या गणेशभक्तांसाठी अखेर मोठी खुशखबर! श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीवर्धक आणि वाद्ये रात्री १२ वाजेपर्यंत वाजविण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी आज २४ सप्टेंबर रोजी याबाबत थेट आदेश काढला आहे.मात्र या आदेशामागची घडामोडही तितकीच वेगवान ठरली!

बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील जिल्हा दौऱ्यावर असताना सिंदखेडराजाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री १२ पर्यंत परवानगी मिळावी, यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे, मागणी समोर येताच पालकमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे स्वतः उपस्थित होते,अशी माहिती देण्यात आली आहे.आमदार मनोज कायंदे यांनी या विषयासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल गणेशभक्तांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

आणि त्यानंतर प्रशासनाची चक्रे वेगाने फिरली!

जिल्हादंडाधिकाऱ्यांनी उपलब्ध असलेला वर्षातील शेवटचा राखीव दिवस २४ सप्टेंबरसाठी मंजूर करत सिंदखेडराजा शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक, ध्वनिवर्धक आणि वाद्ये वाजविण्यास विशेष सूट दिली.

यापूर्वी प्रशासनाने वर्षभरासाठी १३ दिवस निश्चित करून दोन दिवस राखीव ठेवले होते. त्यातील एक दिवस आधीच वापरण्यात आल्याने केवळ एकच दिवस शिल्लक होता. तोही आता सिंदखेडराजाच्या गणरायाच्या विसर्जनासाठी मंजूर झाला आहे.मात्र ही परवानगी केवळ सिंदखेडराजा शहरापुरतीच लागू असून पूर्वीच्या आदेशातील सर्व अटी व शर्ती कायम राहणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!