चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) शहरात अमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत इंदिरानगर परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, एका ३६ वर्षीय इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. जप्त गांजाची किंमत १ लाख ३ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि वाहतुकीविरोधात ‘मिशन परिवर्तन’ राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत चिखली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वातील डी.बी. पथकाला नसीम शेख हसन शेख, रा. इंदिरानगर, चिखली याच्याकडे अवैधरित्या गांजा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
माहितीची खातरजमा केल्यानंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, शासकीय पंच, अधिकृत वजनकाटा धारक आणि फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर इंदिरानगरातील संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून २ किलो ६६ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७६६/२०२६ दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(ii)(C) अंतर्गत कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात पोउपनि शरद भागवतकर, प्रवीण मोरे,अश्विनी गाडे, सचिन ठेंग, पोहेकॉ अमोल गवई, विजय किटे,अजय इटावा, राहुल पायघन,प्रशांत धंदर,सुनील राजपूत,निलेश सावळे, ललिता खरात,पंचशीला ससाणे, रुपाली उगले तसेच पोलीस स्टेशन चिखलीचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.











Total Users : 3500802