spot_img
spot_img

मातृतीर्थात ‘हॅलो बुलढाणा’च्या शिलेदाराचा डंका! देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी संतोष जाधव यांचा दिमाखदार सन्मान! निर्भीड पत्रकारिता अन् सामाजिक कार्याची दखल; आमदार मनोज कायंदे, रविकांत तुपकरांसह दिग्गजांच्या हस्ते ‘फकीरा’ कादंबरी व सन्मानचिन्ह प्रदान!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारे आणि सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे ‘हॅलो बुलढाणा’चे देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी तथा दैनिक नवराष्ट्रचे पत्रकार संतोष जाधव यांच्या कार्यावर मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत सन्मानाची मोहोर उमटली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या समारोपीय जयंती उत्सवानिमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या संतोष जाधव यांनी पत्रकारितेसोबतच सामाजिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या समस्यांना त्यांनी सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यांच्या याच निर्भीड आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी ‘फकीरा’ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शिवसेना नेते विजय अंभोरे, माजी आमदार तोताराम कायंदे आणि भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

‘हॅलो बुलढाणा’चा दमदार शिलेदार म्हणून संतोष जाधव यांनी देऊळगाव राजा तालुक्यात विश्वासार्ह पत्रकारितेचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या सन्मानाने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!