spot_img
spot_img

रायपूरच्या श्री शिवाजी विद्यालयात तिरंग्याचा जल्लोष; लेझिम अन् संगीत कवायतीने रंगला स्वातंत्र्यदिन!

रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रायपूर येथील स्व. मंजुळाई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था संचलित श्री शिवाजी विद्यालयात देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तिरंग्याला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा जागर केला.

संस्थेचे सचिव श्री. एकनाथरावजी कोरडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे, देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली. संगीत कवायत आणि लेझिम पथकाच्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.

कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शुभम एकनाथरावजी कोरडे तसेच संचालक श्री. रामसिंग कानडजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभारी मुख्याध्यापक एस. पी. नप्ते यांच्यासह शिक्षक जी. एन. जाधव, व्ही. व्ही. सपकाळ, टी. डी. आकाळ, पी. बी. जाधव, जी. बी. देशमाने, तसेच सौ. लहाने, सौ. राजपूत, सौ. खंडागळे मॅडम आणि शिक्षकेत्तर कर्मचारी निलेश चिंचोले, पुनमचंद्र पठ्ठे, आय. के. मुरडकर, डी. एस. कुंजरगे यांनी परिश्रम घेतले

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!