spot_img
spot_img

‘रस्त्याचा विकास’ मेहकरच्या चिखलात रुतला! अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा १५ ऑगस्टला पालीके समोर आमरण उपोषण करणार!

मेहकर (अविनाश लाड/ हॅलो बुलढाणा) शहरातील माळीपेठ, नानगड, इमामवाडा आणि जुना आशिर्वाद हॉटेल चौक परिसरातील अत्यंत दयनिय झालेल्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नगर पालिकेला पुर्वसूचना देण्यात आली असून, पालिकेसमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

मेहकर शहरातील रस्त्याच्या अत्यंत दुरावस्थेमुळे आशिर्वाद चौक (जुना) पोस्ट ऑफिस कॉर्नर ते महात्मा जोतीराव फुले उद्यान, माळीपेठ, ओलांडेश्वर मंदिर पर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या परिसरातील ८ ते १० हजार नागरिक नादुरुस्त रस्त्यामुळे त्रस्त झालेले आहेत.
कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे कंत्राटदाराने नवीन पाईपलाईनसाठी रस्ता ठिकठिकाणी खोदला असून, त्यामुळे वाहन धारक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना खड्ड्यांमुळे पाठीचे व मणक्याचे आजार झालेले आहेत.शहरातील या दुर्लक्षित मुख्य रस्त्याचे काम नवीन काँक्रिट रोड व दुतर्फा नाल्यांचे बांधकाम दि.१५ ऑगस्ट २०२६ पूर्वी तात्काळ सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आणि जर ठरवून दिलेल्या मुदतीत काम सुरू झाले नाही,तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मेहकर शहर शाखेच्या वतीने दि.१५ ऑगस्ट २०२६ पासून मेहकर नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचे सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक इंगळे यांनी दिला असून निवेदनाच्या प्रति नगराध्यक्ष किशोर गारोळे,ठाणेदार व्यंकटेश आलेवार,पोलीस स्टेशन मेहकर, जिल्हाधिकारी प्रवीण कुमार देवरे बुलढाणा, स्थानिक आमदार सिध्दार्थ खरात,पालकमंत्री तसेच संबंधित राज्य मंत्र्यांकडे पाठवण्यात आलेल्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!