जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा /ज्ञानदेव राजनकर) शहरात ११ ऑगस्ट रोजी भक्ती, प्रेम आणि सेवेचा अभूतपूर्व संगम अनुभवायला मिळणार आहे. ‘सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा’ हा मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री सत्यसाईबाबांच्या पावन पादुका घेऊन भारतभ्रमण करणाऱ्या ‘प्रेम वाहिनी रथा’चे शहरात आगमन होणार आहे.
मंगळवारी सायंकाळी ४ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिरापासून भजनी मंडळी आणि भाविकांच्या उपस्थितीत रथ देवाशिष लॉनकडे रवाना होईल. तेथे पावन पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता देवाशिष लॉन येथून भव्य शोभायात्रा निघेल. गजानन महाराज मंदिर रोड, डीपी रोड, दुर्गा चौक, जुना बाजार, माळीखेल, अंबिका माता मंदिर, कॉटन मार्केट रोड, उटी, वडशिंगी आणि येनगाव आदी मार्गांवरून ही शोभायात्रा मार्गक्रमण करणार आहे.
नागरिकांनी मार्गावर पाणी शिंपडून, आकर्षक रांगोळ्या काढून आणि पादुकांचे पूजन करून या दिव्य सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करावे, असे आवाहन सत्यसाई सेवा समिती, जळगाव जामोदने केले आहे.










Total Users : 3273445