बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा शहराध्यक्ष मनोज चंदन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करत शहराच्या राजकारणात मोठा धमाका केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या या प्रवेशामुळे आगामी राजकीय संघर्षापूर्वी ठाकरेसेनेने बुलढाण्यात जोरदार ताकद वाढवल्याची चर्चा रंगली आहे.
मनोज चंदन यांचे पक्षात स्वागत करताना आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने आणि जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. चंदन यांच्या प्रवेशामुळे शहरातील ठाकरेसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवी धार मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, वसंतराव भोजने, प्रा. डी. एस. लहाने, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, स्वाती बोरकर, धनश्री चव्हाण, उर्मिला ठाकरे, विजया खडसान, गजानन धांडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे आवाज उठविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. चंदन यांच्या प्रवेशामुळे बुलढाणा शहरात ठाकरेसेनेची मशाल आणखी प्रखर होणार, हे मात्र निश्चित!










Total Users : 3263513