धा.बढे, मोताळा (सादिक शेख/हॅलो बुलढाणा) दिवसागणिक वासनांधता बळावत असून, महिला नराधमांच्या अत्याचाराला बळी पडताहेत. आजही 9 ऑगस्टला एक लज्जास्पद तेवढीच संतापजनक व नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पिडीता बहिणीच्या घरी भेटीसाठी आली असताना रात्री बहिणीच्या नवऱ्याने पिडीतावर बळजबरी बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून वासनांधता दाखविल्याच्या
घृणास्पद प्रकाराने समाजमन खवळले आहे.
पोलीस सूत्रानुसार, पिडिता ही पूर्व मुंबई येथील असून आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील माळेगावचा आहे. रतन अशोक इंगळे असे या वासनांधाचे नाव आहे. आरोपीच्या राहत्या घरी 8 ऑगस्टच्या रात्री हा प्रकार घडल्याने पिडीत महिलेने याप्रकरणी विक्रोळी पोलिसांना तक्रार दिल्याने आरोपी विरुद्ध कलम 64 (1),75 भारतीय न्याय संहिता- 2023प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आधी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तर नंतर धामणगाव बढे पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी तथा पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, मी बहिणीच्या घरी माळेगावला तिच्या भेटीसाठी गेली होती. 8 ऑगस्टच्या रात्री बहीणीचा नवरा तथा आरोपी याने पिडीता झोपलेली असतांना तिला नको तिथे हात लावून अश्लील व संतापदायी चाळे करण्याचा प्रकार केला. याची तक्रार पिडीताने पोलीस स्टेशन विक्रोळी पोलीस स्टेशन येथे केली. त्यांनी गुन्हा नोंद करून सदर गुन्हा पोलीस स्टेशन मलकापुर ग्रामीण येथे वर्ग केल्याने मलकापुर ग्रामीणपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि घटनास्थळ धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने नंतर हा गुन्हा धामणगाव वडे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार निखिल निर्मळ करीत आहेत.










Total Users : 3260198