spot_img
spot_img

धाडसी शेतकऱ्याने चोराशी ‘दोन हात’ केले पण…!

नांदुरा (हॅलो बुलढाणा) सजग शेतकरी व एका चोरट्यांमध्ये झालेल्या झटापटीत चोराने शेतकऱ्याच्या पोटात चाकू भोकसल्याने शेतकऱ्याचा खून झाल्याची थरारक घटना काल मध्यरात्री नांदुरा तालुक्यातील कोटी गावात समोर आली आहे. रायसिंग सिताराम सोळंके (५०) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नांदुरा तालुक्यातील कोटी गावात शनिवारी 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक चोरट्याची चोरी करण्याच्या उद्देशाने एका घरावर नजर खिळवून होती. दरम्यान या घराच्या बाजूला शेतकरी तथा पशुपालक गुरांच्या गोठ्यात असलेल्या रायसिंग सिताराम सोळंके यांना चोरट्याची चाहूल लागल्याने ते चोराच्या पाठीमागे गेले असता चोरट्याने सावध होऊन शेतकऱ्यावर काठी भिरकावून जोरदार प्रहार केला. दरम्यान दोघांमध्ये झालेल्या जोरदार झटापटीत चोराने
रायसिंग सिताराम सोळंके यांच्यावर चाकूचे सपासप वार केल्याने ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले व त्यांचा धाडसाने लढता लढता त्यांची प्राणज्योत मालवली.यावेळी चोराने घटनास्थळावरून पोबारा केला.घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!